स्थानिक शाखा

बेंगळूरु शहराचा पसारा गेल्या दोन-तीनदशकांत इतका वाढला आहे की मंडळ मध्यवर्ती असूनदेखील वाहतुकीची कोंडी आणि अंतराच्या समस्येमुळे कित्येक मराठी कुटुंबांना मंडळात येणे इच्छा असली तरी शक्य होत नाही. अशा सर्व मंडळींसाठी मंडळानेच त्यांच्या जवळ जाण्याचे ठरवले. त्यातून निर्माण झाल्या विभागवार शाखा. सध्या शहराच्या उत्तर आणि पूर्व उपनगरांत सुरु झालेली ही विभागीय मंडळे लवकरच सर्वदूर फैलावतील असा आमचा प्रयत्न असेल.

महाराष्ट्र मंडळ बेंगळूरु उत्तर विभाग

अल्पावधीतच तीस-चाळीस मराठी कुटुंबे ह्या शाखेशी जोडली गेली आहेत आणि त्यांनी दणक्यात कार्यक्रम सुरु केले आहेत.

Tumkur Road, Doddaballapur Road किंवा New Airport roadच्या आसपास तुम्ही रहात असाल तर ह्या विभागीय मंडळात सामील होणे तुम्हाला सोयीचे पडेल. स्थानिक WhatsApp गटात शिरण्यासाठी ह्या क्रमांकावर संदेश पाठवा.

महाराष्ट्र मंडळ बेंगळूरु पूर्व विभाग

२०२० मध्ये करोनापूर्व काळात घेतलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत तब्बल ६० मराठी शट्लर्सनी भाग घेतला आणि मंडळाचा पूर्व बंगलोरातला अध्याय धडाक्याने सुरु झाला.

Outer Ring Road, Old Madras Road, Old Airport Road, Sarjapur Road ह्यांच्या दरम्यान तुम्ही रहात असाल तर ह्या विभागीय मंडळात सामील होणे तुम्हाला सोयीचे पडेल. स्थानिक WhatsApp गटात शिरण्यासाठी ह्या क्रमांकावर संदेश पाठवा